liquor sakal media
मुंबई

स्कॉच व्हिस्कीचे नवीन दर जाहीर; उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात

प्रशांत कांबळे

मुंबई : स्कॉच व्हिस्कीचे (Scotch Whisky price) दर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक असल्याने त्यांच्या उत्पादन शुल्कात (Excise duty) ५० टक्के कपात (fifty percent deduction) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला होता. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने नवीन दरांची घोषणा (New rates increases) केली असून यामुळे त्यांच्या विक्रीबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे.

राज्य सरकारने १८ नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती; मात्र त्यानंतर नवीन दर जाहीर न झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी लवकरात लवकर दर जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने स्कॉच, व्हिस्कीचे नवीन दर जाहीर केले आहेत. स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क तीनशेवरून १५० टक्के करण्यात आले आहे. इतर राज्यांत याच स्कॉच, व्हिस्की मद्याचे दर कमी असल्याने महाराष्ट्रात या मद्याची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत होती.

गोव्यात उत्पादित मद्याच्या खेपा राज्यात अनेक वेळा पकडण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्कॉच, व्हिस्कीचे दर घसरल्याने बाहेरून राज्यात येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीला आळा बसणार आहे. शिवाय, आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटींचा महसूल मिळतो. या शुल्ककपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवील मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT