Vande Bharat Express Sakal
मुंबई

Vande Bharat Express : दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईत दाखल!

पहिल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी घाट विभागात यशस्वी पारपडल्यानंतर आता मध्य रेल्वेची दुसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाली.

सकाळ वृत्तसेवा

पहिल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी घाट विभागात यशस्वी पारपडल्यानंतर आता मध्य रेल्वेची दुसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाली.

मुंबई - पहिल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी घाट विभागात यशस्वी पारपडल्यानंतर आता मध्य रेल्वेची दुसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी रात्री मुंबईत दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाड्यांना १० फेब्रुवारी २०२३ रोजी हिरव्या झेंडी दाखवून उदघाटन करणार आहे. या उदघाटन कार्यक्रमची तयारी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी स्थानकांचा प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर जोरदार सुरु आहेत.

सीएसएमटी- साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी - सोलापूर या दोन वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहे. त्या पूर्वी मध्य रेल्वेची पहिल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची रेल्वेकडून घाट माथ्यावर चाचणी घेण्यात आली आहे. वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस सर्व चाचण्या मंगळावरी यशस्वी पार पडल्या आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभागात कसारा आणि लोणावळा दोन घाटातून रेल्वे गाडयांना पुश- पुलासाठी अतिरिक्त इंजिन जोडावे लागतात. त्यामुळे मेल- एक्सप्रेसच्या गाडयांना वेळ सुद्धा वाया जातोय अशा परिस्थिती विना पुश- पुलासाठी अतिरिक्त इंजिन न जोडता वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस घाटमाथ्यावरून चालवणे कठीण होते. परंतु, रेल्वे मंत्रालयाने यावर तोड काढत वंदे भारत २.० प्रकारातील सातव्या रेल्वेगाडीची इंजिनची क्षमता वाढली आहेत. त्यामुळे अतिरिक्त इंजिन न जोडता वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस एकादमात घाटमाथ्या चढत आहे.

या गतीने धावणार -

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ही ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने धावू शकते. परंतु, मध्य रेल्वे मार्गावरील घाट विभाग आणि रेल्वे मार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन, सीएसएमटी ते कर्जत या मार्गावर १०५ किमी प्रतितास, कर्जत-लोणावळा दरम्यान ५५ किमीप्रतितास आणि लोणावळा-सोलापूर दरम्यान ११० किमीप्रतितास या वेगाने चालविण्याची मजुरी रेल्वे बोर्डाने दिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी २०२३ रोजी सीएसएमटीचा प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून या दोन्ही वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला रेल्वे गाड्यांना हिरव्या झेंडी दाखवून उदघाटन करणार आहे. या उदघाटन कार्यक्रमची तयारी सीएसएमटी स्थानकांवर जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे, कॅमेरा सेटअपपासून ते अतिथिती पाहुण्यांचा बसविण्यापर्यत व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आली आहे. याशिवाय वंदे भारतमध्ये प्रवाशांची गर्दी दिसवती यासाठी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पहिल्या फेरीतुन प्रवास करणाऱ्या सूचना देण्यात आलेल्या आहे. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नोंदणी सुद्धा सुरु करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT