Asaduddin Owaisi Team eSakal
मुंबई

MIMच्या रॅलीला परवानगी नाही; Omicron मुळं मुंबईत जमावबंदी

असदुद्दीन ओवैसी मुंबईत दाखल

सुधीर काकडे

मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दावरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज वक्फ बोर्डाच्या जमीनींना संरक्षण आणि मुस्लीम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी घेऊन आज एमआयएमने आज औरंगाबाद ते मुंबई अशा रॅलीचं आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे मुंबईत मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एमआयएम मात्र मुंबईत (Mumbai) जाऊन सभा घेण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमआयएमने आज खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ते मुंबई अशा रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला सुरूवात झाली असून, रस्त्यात काही ठिकाणी या रॅलीला रोखण्याचा देखील प्रयत्न झाला. त्यानंतर देखील कार्यकर्ते आपल्या भूमीकेवर ठाम आहेत. तर वाढत्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच एमआयएमच्या रॅलीला देखील परवानगी नकारली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे आपल्या सभेसाठी मुंबईत पोहोचले आहेत.

मुंबईत रविवारी रात्री १२ पर्यंत जमावबंदी

मुंबई पोलिसांनी उद्या (12) पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आज रात्रीपासुन उद्या रात्री 12 वीजेपर्यंत मुंबईत जमावबंदी असणार आहे. या काळात कोणतीही सभा, सार्वजनिक कार्यक्रम, रॅली अशा गर्दी करणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नसेल.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबई संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, ठिकठिकाणी नाकेबंदी देखील करण्यात आली आहे. एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवैसी मुंबईत पोहोचले असून, आज संध्याकाळी पाच वाजता त्यांची चांदिवली येथे सभा आहे. मात्र, मुंबईत कलम 144 लागू केल्याने त्यांच्या सभेला अडचणी निर्माण होऊ शकतात.

मागील महिन्यात देखील मुंबईत सभेची परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी ओवैसींनी सोलापुरात एका हॉलमध्ये सभा घेतली होती. आणि त्यांच्या गाडीवर नंबर प्लेट नसल्याने सोलापूर ट्रॅफिक पोलिसांनी २०० रुपयांचा दंड लावला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT