Amit Shah Mumbai Visit 
मुंबई

Amit Shah: मुंबईत शहांच्या ताफ्याची सुरक्षा भेदली! गृहमंत्र्यांच्या कारजवळून गेला बाईकस्वार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर शहा यांचा सुरक्षा ताफा सह्याद्री गेस्ट हाऊसच्या दिशेने निघाल्यानंतर एक धक्कादायक बाब घडली. शहांचा सुरक्षा ताफा भेदून एक बाईकस्वार शहांच्या वाहनाच्या अगदी जवळून गेला. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Security breached on Amit Shah convey in Mumbai a biker come closed to home minister car)

एक लाल रंगाची बाईक अमित शहा यांच्या वाहनाच्या अगदी जवळ गेला. हे लक्षात येताच पोलिसांनी या बाईकस्वाराला तात्काळ थांबवले आणि शहांच्या ताफ्याला पुढे जाण्यास मार्ग मोकळा करुन दिला. त्यानंतर या बाईकस्वाराला पुढे जाऊ दिले.

दरम्यान, एअरपोर्टवरुन निघाल्यानंतर पहिल्यांदा अमित शहा भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या घरी गेले. तावडे यांच्या आईचं नुकतंच निधन झाल्यानं शहांनी तावडे कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यानंतर ते सह्याद्री विश्रामगृहावर भाजप नेत्यांशी बैठक करणार असून या बैठकीत मुंबई महापालिकेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील रणनितीबाबत चर्चा होणार आहे. १५-१६ एप्रिल रोजी शहा मुंबईत असणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असून भाजप-शिवसेना युतीची रणनीतीवर चर्चा करतील.

दरम्यान, नवी मुंबईतील खारघर इथं रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अमित शहा आहेत. अप्पासाहेबत धर्माधिकारी यांना शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT