FASTag annual pass

FASTag annual pass

sakal

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

50 Lakh FASTag Annual Pass Sales : प्राप्त माहितीनुसार, सहा महिन्यांत २६५.५ दशलक्ष व्यवहार झाले आहेत, त्यापैकी अंदाजे २८ टक्के व्यवहार केवळ वार्षिक पासद्वारे झाले
Published on

FASTag Annual Pass and Highway Toll : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ने सहा महिन्यांपूर्वी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू केली आणि या सहा महिन्यांतच तब्बल ५० लाख वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सहा महिन्यांत २६५.५ दशलक्ष व्यवहार झाले आहेत, त्यापैकी अंदाजे २८ टक्के व्यवहार केवळ वार्षिक पासद्वारे झाले आहेत. तब्बल पाच दशलक्ष जणांनी त्यांचा टोल भार कमी करण्यासाठी एनएचएआयच्या वार्षिक पासवर विश्वास व्यक्त केला आहे. 

तर सर्वाधिक व्यवहारांच्या बाबतीत, दिल्लीतील बिजवासन टोल प्लाझा येथे वार्षिक पास वापरून ५७ टक्के व्यवहार केले गेले. दिल्लीतील मुंडका टोल प्लाझा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तेथील  एकूण व्यवहारांपैकी ५३ टक्के व्यवहार वार्षिक पास वापरून झाले. तर हरियाणातील सोनीपत येथील झिंजोली टोल प्लाझा येथे ५३ टक्के व्यवहार वार्षिक पास वापरून केले गेले.

FASTag annual pass
Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

प्रदेशानुसार, चंदीगड प्रदेशात सर्वाधिक १४ टक्के वार्षिक पास वापरून व्यवहार झाले आहेत, तर १२.३ टक्के वार्षिक पास व्यवहार तामिळनाडू प्रदेशात आणि ११.५ टक्के दिल्ली प्रदेशात झाले आहेत.

FASTag annual pass
Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

FASTag वार्षिक पास अशा प्रवाशांसाठी डिझाइन केला आहे, जे वारंवार टोल प्लाझा ओलांडतात आणि प्रत्येक वेळी त्यांना टोल शुल्क भरावे लागते. मात्र या वार्षिक पासमुळे त्यांचा FASTag वारंवार रिचार्ज करण्याची त्यांना आता गरज भासत नाही. राजमार्गयात्रा अ‍ॅप वापरून हा वार्षिक पास तयार करून घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com