Home-Generation-Society Sakal
मुंबई

सुरक्षा वाऱ्यावर रक्षक पाण्यावर!

इतर कामांची जबाबदारी अधिक

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील गृहसंकुलांमध्ये होणाऱ्या कोणत्याही आपत्तीत सुरक्षारक्षक हा प्रथम प्रतिसाद देऊ शकतो. त्यामुळे आपत्तीची व्याप्ती नियंत्रित करण्याबरोबरच जीवितहानी टाळण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे त्यांना प्राथमिक प्रशिक्षण असणे अपेक्षित आहे, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले. मात्र, मुंबईत काम करणारे खासगी सुरक्षा रक्षक फक्त नावापुरतेच असतात. काही अपवाद वगळता या सुरक्षा रक्षकांचा ‘पाणीवाला’ झाला आहे. संकुलातील पाण्याचे पंप सुरू करण्याबरोबरच येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंदणी ठेवण्यापुरतेच ते मर्यादित राहत असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

मुंबईतील करिरोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीत शुक्रवारी (ता.२२) लागलेल्या आगीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. हा सुरक्षा रक्षक ज्या घरात आग लागली होती, त्या घरात कोणी अडकले आहे का हे पहाण्यासाठी गेला होता. नंतर घरातील आग भडकल्याने तो बाल्कनीपर्यंत आला. या दुर्घटनेमुळे सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षणाचा प्रश्‍न अधोरेखित झाला आहे. मुंबईत खासगी सुरक्षा रक्षक कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. लहान मोठ्या निवासी, व्यावसायिक संकुलांना या कंपन्यांमार्फत हे रक्षक पुरवले जातात. मात्र, अशा कंपन्यांकडून पुरवले जाणारे सुरक्षा रक्षक बहुतांश वेळा वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात पोहोचलेले असतात. या सुरक्षा रक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे अपेक्षित असताना, त्यांना फक्त गणवेश घालून उभे केले जाते. मग, सोसायट्याही त्यांना राबवून घेतात. पाण्याचा पंप चालू करण्यापासून गच्चीवरील टाकीत पाणी भरतेय का, हे पाहाण्याची जबाबदारी या सुरक्षा रक्षकांवर सोपवली जाते.

सुरक्षारक्षकांच्या व्यथाही अनेक आहेत. १२ तास काम करूनही महिना अवघ्या आठ-दहा हजारांच्या वेतनावर त्यांना राबावे लागते. आता या पगारात किती राबायचे हा प्रश्‍न आहे. मुख्यत: लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक पूर्वीची नोकरी गेलेले अथवा स्थालांतरित गरजूच जास्त असतात. त्यामुळे सांगेल ते काम करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नसतो. अशी अडचण काही सुरक्षा रक्षकांनी मांडली. राज्य सरकारचे स्वत:चे सुरक्षा रक्षक बल आहे. या सुरक्षा बलातील रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत नियमित प्रशिक्षण दिले जाते, असे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बलचे पोलिस अधीक्षक दीपक देवराज यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षणात काय हवे?

  • आग लागल्यावर इमारतीत कोणत्या प्रकारचे उपाय करावे

  • अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करावा

  • जखमींची हाताळणी कशी करावी

  • नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कसे उभे करावे

  • गर्दी होऊ नये म्हणून काय करावे

सुरक्षा रक्षक कसा हवा?

  • आपत्ती व्यवस्थापनाचे किमान

  • प्राथमिक शिक्षण हवे.

  • शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम हवा.

  • नियमित कवायती करणे अपेक्षित आहे.

  • पालिका देणार प्रशिक्षण

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या धर्तीवर पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. आता सर्व सुरक्षा रक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाबरोबर आपत्ती ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात आपत्ती आल्यानंतर नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी, तीव्रता कमी करण्यासाठी, आपत्तीचा धोका ओळखणे, शक्य तितक्या उपाययोजना करणे अशा बाबींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. वित्तहानी, जीवितहानी कमी करण्याचे प्रशिक्षण यात आहे. एक वर्षाचे अर्धवेळ प्रशिक्षण उमेदवारांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये पालिकेच्या अग्निशमन दलातील तज्ज्ञ, आपत्ती व्यवस्थापन विभागातील तज्ज्ञ, एनडीआरएफ, भाभा अणु संशोधन केंद्रांतील तज्ज्ञ आदींकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT