मुंबई - गुप्तचर संस्थांनी दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत "हाय अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई - गुप्तचर संस्थांनी दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत "हाय अलर्ट'' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 
मुंबई

मुंबईत 'हाय अलर्ट'

सकाळवृत्तसेवा

रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त
मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पुन्हा घातपाताची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, चर्चगेटसह मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे पथक डोळ्यांत तेल घालून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवत आहेत. त्यांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी बोलावण्यात आली आहे. प्रमुख स्थानकांवर संशयास्पद सामानाची श्‍वान पथकांमार्फतही तपासणी सुरू आहे. प्रवाशांकडील संशयास्पद सामानाचीही पोलिस झडती घेत आहेत. बॉंबशोधक व नाशक पथकालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

"एसटी'मध्येही सावधगिरी
आपटा येथे एसटी बसमध्ये बॉंब सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर महामंडळाच्या बसमधून बेकायदा सामान, आणि सामानाची वाहतूक करू नये, अशा सक्त सूचना एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधितांना पत्रकाद्वारे दिल्या आहेत. एसटीचे अनेक चालक-वाहक बसमधून सामानाची बेकायदा वाहतूक करतात. अनेक जण मित्र, परिचितांच्या वस्तूही संबंधितांना पोचवतात. मात्र, याचा फायदा उठवत दहशतवादी घातपात घडवण्यासाठी एसटी बसमध्ये स्फोटके ठेवू शकतात. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी चालक-वाहकांना याबाबत सूचना द्याव्यात, असे पत्रकात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT