मुंबई

दोन तासांच्या चौकशीनंतर कंगना राणावत वांद्रे पोलिस ठाण्यातून बाहेर

अनिश पाटील

मुंबईः  अभिनेत्री कंगना राणावत आणि बहिणी रंगोली विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कंगना राणावत वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर कंगना वांद्रे पोलिस ठाण्यातून बाहेर पडली. कास्टिंग डायरेक्टर साहिल सय्यद यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याच्या चौकशीला कंगना शुक्रवारी एक वाजता वांद्रे पोलिस ठाण्यात हजर राहिली.

17 ऑक्टोबर 2019 ला वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने कंगना राणावत आणि तिची बहीण रांगोली यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार सय्यद म्हणाले होते की,  कंगना राणावत यांच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये जातीय द्वेष आहे. सय्यद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, सध्या बॉलिवूडमध्ये हिंदू मुस्लिमांची संख्या खूप आहे आणि त्यांना काम मिळत नाही.

वांद्रे दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. परंतु कंगना राणावत आणि तिची बहिण रांगोली यांना वारंवार समन्स बजावल्यानंतर ते वांद्रे पोलिस ठाण्यात हजर झाले नाहीत. नंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत आणि तिची बहिण रांगोली यांना वांद्रे पोलिस ठाण्यात हजर रहायला सांगितले होते.

वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण योग्यप्रकारे तपासून या प्रकरणातील प्रश्नांची यादी तयार केली होती. तिची सर्व ट्वीट, व्हिडिओ स्टेटमेन्ट कागदावर घेतली असून त्यावर तिला प्रश्न विचारले गेले. एकदा तिचे विधान नोंदवले गेले की आवश्यकतेनुसार तिला पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले जाण्याची शक्यता आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

sedition case Kangana Ranaut sister Rangoli Bandra Police record their statements

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT