मुंबई

शिवसेना-भाजप राडा; शिवसेनेच्या खासदाराचं रोखठोक मत

सेना भवनासमोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले...

विराज भागवत

सेना भवनासमोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले...

मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ram Mandir) बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत घोटाळा (Scam) झाल्याचे आरोप आपच्या (AAP) नेत्यांनी केले. त्यानंतर मंदिर बांधणीबाबत जमिनीचा जो व्यवहार झाला, त्यातील कागदपत्रे खोटी (Fake Documents) आणि बनावट असल्याचं वक्तव्य शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आले. तसेच, या जमिनीबाबत घोटाळा झाल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर भाजपचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले आणि त्यांनी शिवसेना भवनासमोर (Sena Bhavan) फटकार मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाची शिवसैनिकांना आधीच माहिती होती, त्यामुळे शिवसैनिक तेथे गोळा झाले होते. जेव्हा भाजपचे कार्यकर्ते तेथे आले तेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा (Shivsena BJP Ugly Fight) झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला तर काहींना ताब्यात घेतले. या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी वक्तव्य केले. (Sena Bhavan Ugly Fight between BJP Shivsena Mumbai MP Rahul Shewale Reaction)

"शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे. आमच्या या श्रद्धास्थाकडे वाकडी नजर कोणीही शिवसैनिक खपवून घेणार नाही. मुळात राममंदिर हा केवळ भाजपाचा विषय नसून देशभरातील जनतेच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर जमीन खरेदी प्रकरणात काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अहवाल मागविला आहे. हा अहवाल जनतेसमोर येण्याआधीच भाजपने सुरू केलेली आंदोलनं म्हणजे त्यांनी खुद्द गृहमंत्र्यावर दाखविलेला अविश्वास आहे", अशा शब्दात खासदार राहुल शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला तेव्हा तेथील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरदेखील घटनास्थळी होते. त्यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. "राम जन्मभूमीसाठी शिवसेनाप्रमुखांनी जी आंदोलन केली, ती हिंदुस्थानला माहित आहेत. राम जन्मभूमी हा आमचा वैयक्तिक विषय असून तो आम्हीच पूर्ण करणार अशी भाजपाकडून वातावरण निर्मिती सुरु आहे. म्हणून ही समस्या निर्माण झाली. पण शिवसेना भवन हे आमच्यासाठी पवित्र आहे. सेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहू नका", असा इशारा आमदार सदा सरवणकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT