Amravati Teachers Constituency : महायुती व महाविकासमध्ये दुफळी, बंडखोरी उफाळणार काँग्रेसकडून अदिती पोहरे, भाजपची भूमिका स्पष्ट नाही, सरनाईक यांना आव्हान

Congress Announces Aditi Pohare as Its Candidate : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Amravati Teachers Constituency

Aditi Pohare

esakal

Updated on: 

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांची गर्दी वाढणार आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्हीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. इच्छुकांचे पत्ते दोन्ही आघाडीत कट होण्याच्या शक्यतेने बंडखोरी उफाळण्याची शक्यता वाढली आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शड्डू ठोकण्यासोबतच काँग्रेस व भाजपमधून उमेदवारांनी बंडखोरीचे झेंडे फडकवण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, काँग्रेसने अदिती पोहरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. गेल्या सहा वर्षांपासून व त्यापूर्वीही या रिंगणात नशीब अजमावणाऱ्या उमेदवारांनी यावेळी पक्षीय उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान सदस्य किरण सरनाईक यांची उमेदवारी पक्की मानली जात असतानाच भाजपकडून संगीता शिंदे व शेखर भोयर यांनी घोडे दामटले आहे.

संगीता शिंदे यांच्यासाठी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी भाजपमध्ये प्रयत्न चालविले असून शेखर भोयर यांच्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश वानखडे प्रयत्न करीत आहेत. विद्यमान सदस्य किरण सरनाईक यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने या दोन्ही उमेदवारांची आशा अजून कायम आहे. दरम्यान, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी दाखल केली असून त्यामध्ये माजी सदस्य प्रा. श्रीकांत देशपांडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, वंचित बहुजन आघाडीच्या गाजी मोहमंद जाहेरोश, मेस्टाचे किरण चैाधरी यांचा समावेश आहे.

महायुतीमधून किरण सरनाईक यांची उमेदवारी जाहीर झाल्यास संगीता शिंदे व शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी ठेवली आहे. माजी सदस्य प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी शिवसेना (शिंदे) व अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केले असल्याने बंडखोरीचे संकेत मिळाले आहेत. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक महासंघाकडून दिलीप कडू यांनी उमेदवारी दाखल केली तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके उपस्थित होते.

Amravati Teachers Constituency
Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

महाविकास आघाडीत अकोल्याच्या अदिती पोहरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाने काही महिन्यांपूर्वीच बुलडाणा येथील दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अद्याप त्यांनी अर्ज दाखल केलेला नसला तरी उचल केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. प्रशांत विघे यांनी काँग्रेसकडे मागणी केली होती. मात्र अदिती पोहरे यांच्या उमेदवारीने त्यांची अडचण झाली आहे. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतही बिघाडी निश्चित मानली जात आहे.

Amravati Teachers Constituency
Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

अदिती पोहरे

"दिलीप कडू हे माझे जुने सहकारी आहेत. त्यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने उमेदवारी जाहीर केली आहे. जुने सहकारी या नात्याने मी अर्ज दाखल करताना हजर होतो. याचा अर्थ समर्थन, असा काढता येणार नाही. आमच्या पक्षाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही."

- संजय खोडके, आमदार

"मी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केलेत. हा मतदारसंघ शिक्षक संघटनांचा आहे. २०२४ नंतर राजकीय पक्षांनी शिरकाव केला असला तरी त्यानंतरच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना यश मिळालेले नाही. मला विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा असून त्याआधारे सोमवारी अर्ज दाखल करणार आहे."

- प्रा. प्रशांत विघे, सिनेट सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com