Senior citizen injured in cylinder explosion in Dombivali mumbai sakal
मुंबई

डोंबिवलीत सिलेंडर स्फोटात ज्येष्ठ नागरिक जखमी

देवीचा पाडा परिसरात घडली घटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - गॅस पेटवायला गेले आणि घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन 65 वर्षीय हनुमंत मोरे हे गंभीर रित्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. जखमी मोरे यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याघटनेची नोंद विष्णूनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरातील काशिनाथ निवास चाळ नंबर 3 मध्ये हनुमंत मोरे राहतात. त्यांचा मुलगा श्रीनिवास हा देखील त्यांच्यासोबत रहावयास होता. मात्र दोन वर्षांपूर्वी तो अंधेरी येथे परिवारासह रहावयास गेला होता. मुलगी लहान असल्याने तिचा सांभाळ करावयास कोणी नसल्याने श्रीनिवास हा अंधेरी येथे पत्नीच्या घरी रहात आहे. त्यामुळे डोंबिवलीत वडील हनुमंत हे एकटेच घरी असायचे. रविवारी पहाटे चार च्या आसपास ते घरात एकटे असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला.

सिलिंडर स्फोटामुळे घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त झाले असून घराचे पत्रे देखील उडाले होते. त्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक जागे झाले. त्यांनी त्वरीत 100 नंबरवर फोन करत घटनेची माहिती दिली विष्णूनगर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत हनुमंत यांना लागलीच उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. हनुमंत यांच्या मुलाला देखील याची माहिती देण्यात आली असल्याचे शेजारी राहणारे निलेश चव्हाण यांनी सांगितले. श्रीनिवास यांनी त्यांच्या वडिलांना सध्या अंधेरी येथील रुग्णालयात उपचारासाठी सध्या हलविले आहे.

स्फोटामुळे हनुमंत यांच्या चेहरा, हाता, पायाला गंभीर जखमा झाल्या असून ते 33 टक्के भाजले असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेथे पाहिले असता सिलेंडर शेगडीचे लॉक चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी मनोहर निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT