Indian Railway Sakal
मुंबई

Indian Railway : पूर्ण तिकिटाचा १५ कोटी ज्येष्ठांना भुर्दंड; रेल्वेने सवलत नाकारल्याने नाराजी, गेल्या तीन वर्षांपासूनची स्थिती

उतरत्या वयात देवदर्शन आणि मनसोक्तपणे फिरण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याची भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वेने कोविड काळापासून ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये सवलत देणे बंद केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत १५ कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागल्याची माहिती आरटीआयअंतर्गत मिळाली आहे. यामुळे अनेक जण केंद्र सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. उतरत्या वयात देवदर्शन आणि मनसोक्तपणे फिरण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याची भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

भारतीय रेल्वेकडून कोरोनापूर्व काळात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये ४० टक्के सवलत दिली जात होती. याशिवाय ५८ वर्षांवरील महिलांना रेल्वे तिकिटात ५० टक्के सवलत दिली जात होती. सर्व प्रकारच्या मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतो रेल्वेगाड्यांमध्ये दिली जाणारी ही सवलत कोरोनाचे कारण समोर करून भारतीय रेल्वेने २० मार्च २०२०पासून बंद केली.

कोरोना संपून तीन वर्षांच्या कालावधीत उलटला तरी अद्याप ज्येष्ठ नागरिकांची बंद केलेली सवलत सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेचे पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आरटीआय कार्यकर्ते आणि समाजसेवक अजय बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत भारतीय रेल्वेकडे १ एप्रिल २०२० ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत पूर्ण भाडे भरून रेल्वे प्रवासाचे तिकीट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची एकूण संख्या विचारली होती. त्यांच्या आरटीआयच्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२६ ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडे भरून ट्रेनमधून प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT