Senior IRS officer Senior IRS Sachin Sawant sent to ED custody till July 5 cbi 500 crore scam case rak94 
मुंबई

IRS Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलै पर्यंत ED कोठडी!

रोहित कणसे

वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान आज कोर्टाने त्यांना 5 जुलै पर्यंत ED कोठडी सुवावली आहे.  सचिन सावंत यांच्याविरोधात 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून ईडीने त्यांना अटक केली आहे. दरम्यान काल मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता.

मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात सादर करण्यात आले. यानंतर कोर्टाने त्यांना 5 जुलै पर्यंत कोठडी सुनावली आहे.

भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मंगळवारी सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. हिरे व्यापाऱ्यांकडून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम बेगायदेशीरित्या हस्तांतरित केल्याचा आरोप सचिन सावंत यांच्यावर करण्यात आली होती. या प्रकरणी एका आरोपीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. त्यानंतर ईडीने देखील स्वतःच्याच अधिकाऱ्यावर कारवाई सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT