Mumbai Rain Updates esakal
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पहिल्याच पावसांत दुर्घटनांची मालिका; दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत शनिवारपासून सुरु झालेल्या पावसात दुर्घटनांची मालिका सुरु असून गेल्या दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आला आहे. यात घाटकोपर व विलेपार्ले या दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळून व गोवंडी येथे ड्रेनेज लेनमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पावसांत सलग झालेल्या या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत लांबलेल्या पावसाने जून संपता संपता गेल्या शनिवारपासून दमदारपणे बरसण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस जोरदार कोसळलेल्या या पावसांत पडझडीच्या घटना घडल्या असून यात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

शनिवारी पहिल्या दिवशी गोवंडीत ड्रेनेज लेनमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर रविवारीही पावसाने बॅटिंग सुरुच ठेवली होती. मुंबई शहर व उपनगरांत जोरदार पाऊस कोसळला. या दिवशी घाटकोपर येथील तीन मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगा-याखाली पाचजण अडकले होते.

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन यातील तीन जणांची सुखरुप सुटका केली. मात्र दोघांचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी २४ तासानंतर या दोघांचे मृतदेह सापडले. तर रविवारी विलेपार्ल्यातही एका इमारतीचा भाग कोसळून दोघांना जीव गमवावा लागला.

रविवारी एकाच दिवशी इमारत कोसळण्याचा दोन घटनांत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पावसांत सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे सुरक्षेच्यादृष्टीने चिंता व्यक्त केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT