Crime sakal
मुंबई

घरी कोणी नसताना नोकराने मालकाच्या अल्पवयीन मुलीचे काढले न्यूड फोटो

मालकाची मुलगी तरुणाच्या मोबाईलवर गेम खेळत असताना ही घटना उघडकीस आल्याचे पोलीसांनी सांगितले.

निकिता जंगले

मालकाच्या तेरा वर्षीय मुलीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ क्लिक केल्याप्रकरणी नोकराला (Servant) अटक करण्यात आली आहे. मालकाची मुलगी तरुणाच्या मोबाईलवर गेम खेळत असताना ही घटना उघडकीस आल्याचे पोलीसांनी सांगितले.

आरोपी हा दक्षिण मुंबईत त्याच्या मालकाच्या घरी राहत होता. अनेकदा अल्पवयीन मुलगी कपडे बदलत असताना आरोपी फोटो आणि व्हिडिओ काढायचा. मंगळवारी मालकाची मुलगी तरुणाच्या मोबाईलवर गेम खेळत असताना तीला तीचे कपडे बदलत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ दिसले. याविषयी मुलीने आपल्या आईला सांगितले. त्यांनतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय.

आरोपी मूळचा झारखंडचा असून तो आठ वर्षांपासून या घरात काम करत होता. तर मालकाचे दक्षिण मुंबईत गिफ्ट शॉप असल्याने पती पत्नी दोघेही अनेकदा कामावर जात असत. त्यामुळे त्यांनी मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी नोकराला दिली होती. आरोपी नोकर गेल्या चार महिन्यांपासून हे कृत्य करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीचा फोन जप्त करण्यात आला असून इतर अनेक अल्पवयीन मुलीचे फोटोही पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सापडले. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT