मुंबई

मुलुंडमध्ये सात इमारती धोकादायक

CD

मुलुंडमध्ये सात इमारती धोकादायक
टी विभागातर्फे यादी जाहीर
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. याच अनुषंगाने मुलुंडमधील १२ इमारती राहण्यासाठी धोकादायक ठरवल्‍या आहेत. इतर दोन धोकादायक इमारतींचे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.
मुलुंडमधील वल्लभ भुवन, बाल स्मृती इमारत, पुष्पा निवास, गिरिराज ब्रिजवासी भुवन बी बिल्डिंग, सुशीला सदन, प्रागजी सुंदरजी (मोची) बिल्डिंग, रमणी भुवन अशा एकूण सात इमारती पाडण्यात येणार आहेत. याशिवाय महादेव निवास या इमारतीचे पाडण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे मुलुंडमधील एकवीरा सदन ही इमारत स्वतः मालक पाडणार आहेत, असे टी विभागातर्फे सांगण्यात आले. आतापर्यंत अभिजित ही इमारत पाडण्यात आली आहे. लक्ष्मी छाया आणि महामाया या दोन इमारतींचे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. याशिवाय ब्रम्हज्योती आणि नवीन मंजु सीएचएस या दोन इमारती लवकरच रिकाम्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती टी विभाग पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
दरवर्षी पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या घटना समोर येतात. यामध्ये मनुष्य आणि वित्तहानी होते. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अशा शेकडो इमारती आहेत. जिथे गेल्या सहा दशकांपासून रहिवासी राहतात. इमारत पाडल्यानंतर त्यांना कठीण प्रसंगातून जावे लागते. अनेक रहिवाशांचे पुनर्वसन, मुलांच्या शाळांचा प्रश्न, आर्थिक संकट उभे राहते. पालिका प्रशासनाने रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरामध्ये करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT