Mumbai Sakal
मुंबई

चायनीज पदार्थातून सात जणांना विषबाधा

विक्रेत्याविरोधात मोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

उरण : चायनीज (Chinese) फ्राईड राईस खाल्ल्याने उरण (Uran) येथील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी मोरा पोलिस ठाण्यात (Thane) चायनीज पदार्थविक्रेता दीपक रमेश थळी (Ramesh Thali) आणि कामगार अर्जुन सत्येंद्रनाथ घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नातवंडे आजोळी मामाच्या गावाला केगाव येथे आली होती.

त्यांनी आजोबांकडे चायनीज खाण्याचा हट्ट केला. त्यानुसार आजोबांनी बुधवारी रात्री उरणच्या एनआय हायस्कूलजवळील एका चायनीजच्या दुकानातून नातवंडांसाठी फ्राईड राईस आणले. फ्राईड राईस खाल्ल्यानंतर मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उरण येथील इंदिरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे.सुजल सुजित पाटील (वय ७), रिता सत्येंद्र ठाकूर (वय ३८), सिद्धार्थ सत्येंद्र ठाकूर (वय ११), अर्णव भरत पाटील (वय ९), सिया नीलकमल थळी (वय ९), सानिया सुनील म्हात्रे (वय १५) आणि आर्या सुनील म्हात्रे (वय ४) अशी विषबाधा झालेल्यांची नावे असून मोरा पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Pune Cyber Fraud : पुण्यात आरटीओच्या बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाची सायबर फसवणूक; तीन लाखांचा गंडा

T20 World Cup IND vs NAM : अभिषेक शर्मा मुकला, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल; नामिबियाने टॉस जिंकून....

SCROLL FOR NEXT