IIT Bombay  sakal mumbai
मुंबई

आयआयटी मुंबई देणार लिंग जागरुकतेचे धडे

संजीव भागवत

मुंबई : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशभरात नावाजलेल्या आणि मोठ्याप्रमाणात इंजिनियर घडवणाऱ्या मुंबई आयआयटीमध्ये (Mumbai IIT ) आता लिंग जागरुकतेचे (sex education) धडे शिकवले जाणार आहेत. आयआयटी मुंबई संकुलात मुलींचे प्रमाण (girls) प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी असून त्या पार्श्वभूमीवर मुलींना जुळवून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम (syallabus) आणला गेला असल्याचे सांगण्यात आले. पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभ्यासक्रम आयआयटी मुंबईमध्ये शिकवला जाणार असून विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यां (students) सोबतच येथील प्राध्यापक अनेक कर्मचाऱ्यांना सुद्धा उपलब्ध असणार असल्याची माहिती आयआयटीचे संचालक प्रा. शुभाशिष चौधरी (subhasis chaudhari यांनी दिली.

आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये मुलींची संख्या ही तुलनेत कमी आहे. यामुळे मुलींना येथे जुळवून घेणे कधी कधी अवघड जाते. यासाठी आयआयटी मुंबईतील ‘जेंडर कक्ष’ हा यासाठी सातत्याने विविध उपक्रम घेत असतो. आता या कक्षातर्फे एका विशेष अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. ‘मूक्स’ अर्थात ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून लिंग जागरुकता केली जाणार आहे. यामुळे संस्थेच्या विद्वत सभेने हा शून्य श्रेयांक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे संस्थेत अधिक चांगले वातावरण निर्माण होईल आणि एकमेकांविषयी आदर भावना निर्माण होईल असा विश्वास चौधरी यांनी समाज माध्यमावर लिहलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. याचबरोबर लवकरच हा अभ्यासक्रम संस्थेतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठीही विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT