Sanjay Pande Mumbai CP
Sanjay Pande Mumbai CP File Photo
मुंबई

शब-ए-बरातवेळी भोंग्याचा आवाज कमी करा; मुंबई पोलीस आयुक्तांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : यंदा धूलिवंदन आणि एकाच दिवशी आले आहे. या निमित्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील ३४ मौलवींची भेट घेतली. यावेळी पांडे यांनी शब-ए-बरातवेळी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी भोंगे, लाऊडस्पीकर्सचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले. (Shab E Barat 2022 Mumbai Police)

ध्वनिप्रदूषणामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ध्वनिप्रदूषणावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घातली. त्यानंतर पांडे यांनी आगामी शब-ए-बरातनिमित्त गुरुवारी शहरातील ३४ मौलावींची भेट घेतली. सध्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे भोंगे, लाऊड स्पीकरचा आवाज कमी ठेवावा. उत्सवावेळी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पांडे यांनी मौलवींना केली. मौलवींच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद उस्मान अशरफी यांनी पोलिस आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही पोलिसांना सहकार्य करू, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT