aryan shah rukh gauri 
मुंबई

आर्यनने कारागृहातून शाहरुख-गौरीशी व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद

आर्यन दहा मिनिटं आई-वडिलांशी बोलला.

स्वाती वेमूल

आर्यन दहा मिनिटं आई-वडिलांशी बोलला.

क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या Shah Rukh Khan मुलाचा, आर्यनचा Aryan Khan कारागृहातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. आर्यनने केलेल्या जामीन अर्जावरील निकाल विशेष न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. दसऱ्यानिमित्त आर्यनने आर्थर रोड कारागृहातून आई गौरी Gauri Khan आणि वडील शाहरुख खानशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. आर्यनने दहा मिनिटं आई-वडिलांशी गप्पा मारल्या. सणासुदीच्या काळात कारागृहात कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांना भेटणं शक्य नसल्यामुळे कारागृह प्रशासनाने व्हिडीओ कॉलिंगची व्यवस्था केली आहे.

कारागृहातील अंदाजे एकूण ३२०० कैद्यांना टप्याटप्याने १० मिनिटांसाठी व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलण्याची संधी दिली जाते. सध्या आर्थर रोड कारागृहात व्हिडीओ कॉलिंगसाठी ११ स्मार्टफोन हँडसेट आहेत. "आर्यनने व्हिडीओ कॉलिंगसाठी आईचा नंबर दिला. आई आणि वडिलांसोबत तो जवळपास १० मिनिटे बोलला", अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने दिली. कारागृहाच्या नियमांनुसार, गुन्हा सिद्ध न झालेले आरोपी हे महिन्यातून दोन किंवा तीन वेळा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा वकिलाशी संवाद साधू शकतात.

आर्यनसह पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. २ ऑक्टोबरपासून तो अटकेत आहे आणि सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर एनसीबीने गंभीर आरोप केले असून आंतरराष्ट्रीय तस्करांशी त्याचा संपर्क होता असा दावा केला आहे. विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी तीनही अर्ज २० ऑक्टोबर रोजी निकालासाठी राखून ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT