मुंबई

अवैध रेती उपसा करणाऱ्यांना शहापुर तहसीलदारांचा दणका! पाच बोटी केल्या नष्ट

प्रकाश परांजपे

शहापूर: वैतरणा धरणात अवैध रेतीउपसा व वाहतुकीसाठी वापरलेल्या 11 बोटीपैकी पाच बोटी महसूल विभागाने कारवाई करत जप्त केल्या होत्या; तर सहा बोटी रेतीउपसा करणाऱ्यांनी पाण्यात बुडवल्या होत्या. आज पाच बोटी कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्याची माहिती शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी दिली; तर बुडविण्यात आलेल्या बोटी महापालिका कर्मचारी वर काढून नष्ट करतील, असेही तहसीलदारांनी सांगितले. त्याबाबतचे पत्र मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. 

तहसीलदार सूर्यवंशी यांनी मुबई महापालिका आयुक्त, उप वनसंरक्षक शहापूर आणि सहायक वनसंरक्षक, वन्यजीव शहापूर यांना पत्र लिहून बोटींच्या सहाय्याने अवैध रेती उपसा व वाहतूक करून जवळच अवैध साठा व वाहतूक केली जाते. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत रस्ता बांधण्यात आला, याकडे लक्ष वेधले होते. या पत्रात शहापूर पोलिस ठाण्यामध्ये 12 मे 2015, 24 मार्च आणि 28 आक्‍टोबर 2018 असे तीन गुन्हे नोंदविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अवैध रेती वाहतूक करण्यासाठी वैतरणापाडा येथील हनुमान मंदिर ते मोडकसागर तलावापर्यंत 21 हजार 352 ब्रास मातीचा वापर करण्यात आला आहे आणि त्याचा दंड म्हणून 22 कोटी 22 लाखांची रक्कम ज्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल, त्यांच्याकडून वसूल केला जाईल, असे सांगितले. 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसह शिंदेंना धक्का, भाजपने एका दगडात मारले दोन पक्षी; बड्या नेत्याचा भाजपप्रवेश

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Solapur Election : निवडणुकांच्या तोंडावर भाजप मतदाराना भुलवणाय्रा योजना; काँग्रेस जिल्हाध्यक्ष शटगार!

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडियाचे गुजरातमधील 'या' कंपनीसोबत विलीनीकरण होणार, एनसीएलटीकडून मोठी मान्यता

Latest Marathi Breaking News : देश विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT