Sharad Pawar eSakal
मुंबई

Sharad Pawar: शरद पवार गटातून मुरबाड विधानसभा मतदारसंघात 'या' नावाची चर्चा

Maharashtra Vidhansabha Election : प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख व हेमंत रूमणे या इच्छुक उमेदवारांच्या गुरुवारी मुलाखती झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Badlapur Latest News: मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या शैलेश वडनेरे यांचे पारडे दिवसागणिक जड होत आहे.

आता महविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेससह विविध पक्ष व संघटनांनी शैलेश वडनेरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. महाविकास आघाडीकडून वडनेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे,

तर दुसरीकडे विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन, तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार सातत्याने जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर उमेदवारीसाठी इच्छुकांची नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्रही सुरू आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरेही मुरबाड विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासह प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख व हेमंत रूमणे या इच्छुक उमेदवारांच्या गुरुवारी मुलाखती झाल्या आहेत.

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा शैलेश वडनेरे यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच अन्य नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या वेळी पक्षाच्या नेत्यांनी 'कामाला लागा' असे सूचक संकेत दिल्याबद्दल शैलेश वडनेरे यांनी समाधान व्यक्त केले. आपले पक्षकार्य, सामाजिक कार्य, तसेच उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात मिळत असलेला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा लक्षात घेत त्यांनी या विविध पक्षांचे आभारदेखील मानले आहेत.

कोणाचा पाठिंबा?

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी शैलेश वडनेरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. उच्चशिक्षित असलेले शैलेश वडनेरे मुरबाड मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वास जाधव यांनी पाठिंबा पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

आरपीआय (आरके) प्रदेश सचिव अशोक गजरमल, बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे, शरद पवार गटाचे सेवादल शहराध्यक्ष विशाल सरकारे, कुणबी सेनेचे कल्याण तालुकाप्रमुख गोरक्ष बांधणे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुरबाड तालुका कामगार अध्यक्ष संजय वाघचौडे, कोकणी मुस्लिम आणि तेली मुस्लिम संघटना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे व इतर पदाधिकाऱ्यांनी वडनेरे यांना पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT