Sharad Pawar  esakal
मुंबई

Sharad Pawar : शरद पवार धमकी प्रकरणातील आरोपीच्या 2 बनावट प्रोफाईल; तपासात खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरण पुण्यातून सागर बर्वे नामक आरोपीला रविवारी मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.सागर बर्वे हा आय टी इंजीनियर असून पुण्यातील एका खाजगी आयटी कंपनीत कार्यरत आहे. शरद पवार यांना धमकी देण्यासाठी आरोपी सागरकडून सोशल मीडियावर 2 बनावट अक्काऊंटस तयार करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.

धमकी देताना आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने अक्काऊंटसचा वापर केल्याचे पोलीस तपासात माहिती मिळत आहे.आरोपीने धमकी देण्या मागे काय कारण होते याचा पोलीस तपास करत आहेत.

बनावट अक्काऊंटस बनवून धमकी

आरोपी सागर बर्वे याने सोशल मीडियावर शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वेने शरद पवारांना धमक्या देण्यासाठी सोशल मीडियावर दोन बनावट अक्काऊंटस तयार केली होती. नर्मदाबाई पटवर्धन या नावाने बनावट खाते तयार केले.

सोशल मीडियावर बनावट अक्काऊंटचा वापर करून आरोपीने एका पोस्टमध्ये शरद पवारांनाही नरेंद्र दाभोलकरांप्रमाणेच मारले जाईल अशा धमकी वाचक मजकूर प्रसिद्ध केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. धमकी देण्यामागे नेमके काय कारण होते याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनाक्रम

फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या संदर्भात सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती.

फेसबुकवर धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत होती. या तपासा दरम्यान पुण्यातून सागर बर्वेला रविवारी मुंबई पोलीसांनी अटक केली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT