Sharad Pawar Grass Painting Sakal
मुंबई

Sharad Pawar Birthday : अर्धा एकर जमीनत तब्बल ८३ फुटांची शरद पवारांची ग्रास पेंटिंग! शैलेश वडनेरे यांची संकल्पना!

शेतकरी तरुणाने मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या शेतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८३ वाढदिवस निमित्ताने शरद पवार यांची ८३ फुटांची ग्रास पेंटिंग साकारली.

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर - कलाकृतींची आवड असणाऱ्या एका शेतकरी तरुणाने मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या शेतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८३ वाढदिवस निमित्ताने शरद पवार यांची ८३ फुटांची ग्रास पेंटिंग साकारली. राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या संकल्पनेतुन नंदू शिंदे या तरुणाने ही कलाकृती साकारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय नेत्याला वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट देण्याचे मनात असताना, मुरबाड मधील एक तरुण शरद पवारांचा खंदा समर्थक असलेला नंदू शिंदे या तरुणाने शेतात बियाणे रुजवून त्यातून आलेल्या छोट्या छोट्या गवतरुपी पिकात शरद पवारांची प्रतिमा साकारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

व १५ दिवस मेहनत करुन, मुरबाड पासून सहा किमी अंतरावरील शिरगाव गावामध्ये आपल्याच शेतात शरद पवार यांची ग्रास पेंटिंग साकारत त्यांना ८३ व्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांची ही कलाकृती अर्धा एकर जमिनीवर साकारली असून त्यासाठी ४० किलो बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यात १० उडीदडाळ आणि 30 किलो मूग असे ४० किलो धान्य पेरणीसाठी वापरले आहे. पवारांची धान्यातील प्रतिमा साकारण्यासाठी जमिनीची मशागत करून त्यावर पेरणी करण्यात आली. त्यानंतर ते धान्य उगविण्यासाठी योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनाद्वारे पाणी देऊन उगविण्यात आले.

१५ दिवसांच्या या अथक मेहनत आणि प्रयत्नातून पवारांची प्रतिमा साकारली. यावेळी शिरगावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन साहेब हा शब्द देखील साकारण्यात आला. ८३ फुटांची ग्रास पेंटिंग दाखवण्यासाठी ड्रोन चा वापर करण्यात आला. यावेळी साकारण्यात आलेली शरद पवार यांची प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तर कलाकृतीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

देशाचे कृषीमंत्री पद भूषविणारे व देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असणाऱ्या शरद पवारांचा ८३ वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यासाठी शेतात पेंटिंग साकारून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून आम्ही या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा साहेबांना दिल्या आहेत.

- शैलेश वडनेरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT