Mangalvedha lift Irrigation Scheme inaugurated Sharad Pawar
Mangalvedha lift Irrigation Scheme inaugurated Sharad Pawar sakal
मुंबई

'मी १६ वर्षांचा होतो, मला आठवत नाही', कोरेगाव-भीमाच्या सुनावणीत पवार म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) आज साक्ष नोंदवली. याप्रकरणी त्यांना तिसरं समन्स प्राप्त झालं होतं. त्याची सुनावणी मुंबईत पार पडली. यासाठी सकाळीच शरद पवार सह्याद्री रेस्टहाऊसमध्ये दाखल झाले. निवृत्त न्यायमूर्ती जे.एन पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पवारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये पवारांनी काही खुलासे केले आहेत. (Sharad Pawar hearing on Bhima Koregaon Violence)

या सुनावणी दरम्यान पवारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या हवाल्याने प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. (Sharad Pawar Speaks)

प्रश्न - एखाद्या वक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेच नुकसान होतं तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची असते?

शरद पवार - लोकप्रतिनीधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नयेत, जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल. राजकीय नेते जाहीरपणे बोलतात त्याच्या वक्तव्यावरून समजत गैरसमज होता कामा नये.ही खबरदारी घेतली पाहिजे जर काही झालं तर जबाबदारी टाळता येणार नाही

प्रश्न: कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात?

शरद पवार - अश्या सभांना जागा देताना त्यामुळे सर्वसामन्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणतीही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

प्रश्न: एल्गार परिषद तुम्ही काय बोललेमाझं प्रेस स्टेटमेंट असण्याची शक्यता आहे

उत्तर: एल्गार परिषदेत जे हजर नव्हते त्यांच्यावर केस झाल्या हे योग्य नाही हे विधान मी केलेलं आहे. मी एल्गार बदल बोललो

प्रश्न: तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतूदींच्या आधारे आहे?, वकिलांचा सवाल

उत्तर: आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे. जर माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर ते जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम 124 A हे ब्रिटीश कालीन आहे. मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीनं होताना दिसतोय. तो थांबायला हवा असं मला वाटतं.

प्रश्न: मात्र ही गोष्ट तुम्ही एक राज्यसभा सदस्य या नात्यानं संसदेतही मांडू शकता, मग तिथं हे का मांडत नाही?

उत्तर: होय, बरोबर आहे. मला वाटतं जेव्हा मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी तिथंही या गोष्टी मांडेन

प्रश्न: गंभीर गुन्ह्याची माहिती गोळा करत असतात.. पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे माहिती मिळाली की कारवाई करावी.. की माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या सूचनांची वाट पाहावी?

उत्तर: महाराष्ट्र पोलीस manual मध्ये अशी परिस्थिती झाली. पोलीस दलाला थेट कारवाई करण्याचे मार्गदर्शक तत्व दिले आहेत. त्या आधारे त्यांनी कारवाई करावी.

प्रश्न: कोरेगाव भीमा दंगल झाली. त्यांना डिस्टर्ब केलं ते लोक जबाबदार आहेत. पोलीस व्यतिरिक्त कोण जबाबदार आहे.

उत्तर: पोलीस जबाबदारी टाळता येणार नाही. कायदा सुव्यवस्था राखणे आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करणे पोलिसांची जबाबदारी आहे.

प्रश्न: प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला ,त्याचे तीव्र पडसाद उमटले, नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची?

उत्तर: मला याबाबत काही बोलायचं नाही. इतर कोणी काय भूमिका घेतली कार्यक्रम घेतले,त्याचे काय परिणाम झाले. यात जायची मला आवश्यकता वाटत नाही.

प्रश्न: जबाब नोंदवायला देवेंद्र फडणवीस ,प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे,रामदास आठवले यांना आयोग पुढे आणले पाहिजे का?

उत्तर: आयोग या निष्कर्ष पर्यंत आले असावे की ही या लोकांना बोलवावे तर त्यांनी ठरवावे

तुकाराम गवारे यांचे वकील बनसोडे यांनी विचारलेले प्रश्न

प्रश्न: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुमचं घर हे केंद्रस्थानी होत?

उत्तर : मी केवळ कोरगाव भीमासाठी आलोय. मी त्यावेळी 16 वर्षांचा होतं. त्यामुळे इतकं जुनं मला काही आठवत नाही.

प्रश्न: भिडे आणि एकबोटे याना ओळखता का

उत्तर: वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी वाचले

कधी भेटलो नाही,व्यक्तिशः ओळख नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT