Sharad Pawar 
मुंबई

Sharad Pawar: अतिक अहमद प्रकरणावर शरद पवारांचं सूचक भाष्य! मुंबईतल्या इफ्तार पार्टीत मांडली भूमिका

यावेळी पवारांनी भाजपवर टीका केली असून सल्लाही दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उत्तर प्रदेशातील गँगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद याच्या हत्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. थेटपणे न बोलता त्यांनी भाजपवर या प्रकरणावरुन निशाणा साधला आहे. देश संविधानानुसार चालतो पण त्याकडं दुर्लक्ष करुन चालण्याची सवय सत्ताधाऱ्यांनी लावली तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ, असं पवारांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar comment on Atiq Ahmed murder at Iftar party in Mumbai)

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. दुपारी आपल्या कथीत बंडाबाबतच्या चर्चांवर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर ते या पार्टीत काहीसे निवांत पहायला मिळाले.

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, "संविधान आणि कायद्यानुसार देश चालतो. संविधान आणि कायद्याकडे दुर्लक्ष करून पावलं उचलण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लावली तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ. संविधान आणि कायदा हातात घेऊन चुकीच्या गोष्टींना प्रोत्साह दिलं जातं तसेच हे चांगलंच असल्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते देशासाठी योग्य नाही, असंही शरद पवार यांनी मुंबईतील इफ्तार पार्टीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT