Sharad Pawar criticizes Udayanraje Bhosale in Navi Mumbai 
मुंबई

'महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत'; पवारांचा उदयनराजेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

नेरूळ (नवी मुंबई) : 'महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या!' असे ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (ता. 16) केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक व अनपेक्षित होता. त्यांच्या पक्षांतरावर टोला लगावतानाच पवार यांनी म्हणले आहे की, शिवाजी महाराज स्वार्थासाठी कधीच दिल्लीकरांपुढे आधीन झाले नाहीत. तर त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये उत्साह व स्वाभिमान निर्माण करून रयतेचे राज्य निर्माण केले. 

'आम्हाला कोणाच्या जाण्याचे कधीच फरक पडत नाही. सर्व मावळ्यांना एकत्र करून नवा महाराष्ट्र घडवू' असेही पवार यावेळी म्हणले. यावेळी त्यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या तहाचे उदाहरण दिले. 

सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसमधून शिवसेना व भाजपमध्ये होणाऱ्या आऊटगोईंगमुळे सगळेच अवाक झाले आहेत. मो़ठ-मोठे नेतेही राष्ट्रवादीमधून बाहेर पडू लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT