मुंबई

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य..

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी रिपाई नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेवर भाष्य केलंय. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधात बसायचा कौल दिला आहे. अशात NCP विरोधातच बसणार असं, शरद पवार यानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय. याचबरोबर त्यांनी भाजप आणि शिवसेनेला समंजसपणा दाखवण्याचा सल्लादेखील दिला आहे. 

या दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रात आता पुढे काय होऊ शकतं? यावरही मोठं विधान केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते मात्र मध्यावधी निवडणुका लवकर लागणार नाहीत असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. 

शरद पवारांच्या प्रेस वार्ता मधील महत्त्वाचे मुद्दे :  

  • महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्यात इतके दिवस सरकार स्थापन होऊ नये ही गंभीर बाब.. 
  • महाराष्ट्रात अशी परिस्थिती जास्त दिवस राहू नये.. 
  • महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नक्की काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर बोलण्यासाठी रामदार आठवेल मला भेटले..
  • शिवसेना आणि भाजपने लवकर सरकार स्थापन करावं..
  • शिवसेना आणि भाजपने समंजसपणा दाखवावा आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावं..
  • आम्हाला विरोधात बसण्याचा कौल महाराष्ट्रातील जनतेने दिलाय. आम्ही विरोधातच बसणार  
  • राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला बोलवत का नाहीत? हे मला समजू शकलेलं नाही  
  • आमचा भाजप आणि शिवसेनेला राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचा सल्ला राहील, त्यामुळे महाराष्ट्रात  लवकर सरकार स्थापन करा

Webtitle : sharad pawar on current political situation of maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT