Sharad Pawar 
मुंबई

Sharad Pawar: कंत्राटी पोलीस भरतीवरुन शरद पवारांचा सरकारवर निशाणा! म्हणाले, "सरकार बदलण्याची वेळ"

Sandip Kapde

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच अजित पवार गटाला देखील सुनावले. कंत्राटी पोलीस भरतीवरुन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.  कंत्राटी पोलीस भरती निर्णय घातक असल्याचे शरद पवार म्हणाले.

कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्विकारला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. काही लोकांनी दिल्लीच्या दोन कोर्टात आपल्याला नेले आहे. एक निवडणूक आयोग आणि दुसरं सुप्रीम कोर्ट. या दोन्ही ठिकाणी आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला. जेव्हा निकाल लागले तेव्हा सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या बाजुने निकाल लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे वकिलांना लागेल ती माहिती देत असतात. राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होत पण नंतर आमदार फुटले. दिल्ली पंजाब उत्तराखंड झारखंड पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजपा आहे?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे, हे चित्र आता सिद्ध होत आहे. देशात सत्तेचा गैरवापर होत आहे.  सत्ता ही लोकांसाठी असते. केंद्र सरकारचे निर्णय सामान्य लोकांच्या फायद्याचे नाहीत. नोकऱ्या आता कंत्राट पद्धतीने दिल्या जात आहेत. काही नोकरी ११ महिन्यांची आहे. ११ महिने काम केल्यावर पुढे काय करायच?, असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार म्हणाले, "मी राज्यमंत्री पदापासून विधिमंडळात काम केले. मी मुख्यमंत्री होतो, गृह खात माझ्याकडे होत. त्यामुळे पोलिसांची ड्युटी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे. त्यांना आता ११ महिन्यांची नोकरी दिली तर काय होईल. पोलिसांना कत्रांटी पद्धीतीने नोकरीत घेण हे चुकीचं काम या देशात कोणी केलं नाही. ते काम भाजपच्या सरकारने केलं."

आर आर पाटील लोकप्रिय गृहमंत्री होते. माहिती कशी काढावी, निर्णय कसा घ्यावा त्यांना चांगल माहित होत. कधी कुणी तक्रार केली नाही. आता त्या सगळ्या गोष्टी नाहीत. पोलिसांची कंत्राटी भरती हा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तसेच पोलीस कुटुंबांच्या दृष्टीने देखील चुकीचा आहे. त्यामुळे हे सरकार बदलण्याची घोषणा आपल्याला केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT