Sharad Pawar and Pancham Kalani sakal
मुंबई

Ulhasnagar News : शरद पवार यांची राजकारणातील केंद्रबिंदू कालानी महालात भेट

राजकारणातील केंद्र बिंदू असणाऱ्या उल्हासनगरातील कालानी महालात आज नॅशलिस्ट काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - राजकारणातील केंद्र बिंदू असणाऱ्या उल्हासनगरातील कालानी महालात आज नॅशलिस्ट काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून युथ आयकॉन ओमी कालानी यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले आहे.

शहर पवार आणि कालानी कुटुंब एक नाते असून 2002 मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता काबीज केली होती. ज्योती कालानी ह्या अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत. याघडीला पंचम कालानी ह्या जिल्हाध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी एकत्रित असताना अजित पवार यांनीही कालानी महालात भेटी दिलेल्या आहेत.

राज्य शासनाने महाराष्ट्रातील 62 हजार शाळांच्या खाजगीकरणाचा घाट घातला आहे. याचा विरोध करण्यासाठी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या महाएल्गार सभेसाठी शरद पवार हे उल्हासनगरात आलेले आहेत. तत्पूर्वी पवार यांनी कालानी महालात भेट दिली. पवार यांची एन्ट्री होताच ओमी कालानी यांनी त्यांचे आशिर्वाद घेतल्यावर जिल्हाध्यक्ष पंचम कालानी यांच्यासोबत बैठक झाली.

यावेळी नेते जितेंद्र आव्हाड, महेश तपासे तसेच राष्ट्रवादीचे कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती, नरेंद्रकुमारी ठाकूर, मनोज लासी, शिवाजी रगडे आदी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. पप्पू कालानी यांनी राजकिय सन्यास घेतल्याने ते दिसले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT