Shark Fish Sakal
मुंबई

Palghar News : शार्क माश्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

मनोर लगतच्या वैतरणा खाडी पात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी शार्क माशाने मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला गंभीर जखमी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पालघर - मनोर लगतच्या वैतरणा खाडी पात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी शार्क माशाने मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला गंभीर जखमी केले आहे. तरुणाला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोनशे किलो वजन असलेला शार्क मासा पकडण्यात मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांना यश आले आहे.

वैतरणा खाडी पात्रात ओहोटीच्या वेळी पाण्याचा स्तर कमी झाल्याने शार्क माशाचा वावर वैतरणा खाडी पात्रात मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांना दिसला. शार्क माशाने खाडी पात्राच्या पलीकडे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला खाडी पात्र ओलांडताना चावा घेत पायाचा लचका तोडला आहे. जखमी तरुणाला गायकवाड डोंगरी वरील ग्रामस्थांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. शार्क माशाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

विकी सुरेश गोवारी (वय.32) याला सिलवासा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वैतरणा खाडी पात्राच्या शेवटच्या टोकापर्यंत साधारणपणे तीस ते चाळीस किलोमीटर अंतर पार करून समुद्रातील शार्क मासा मनोरपर्यंत पोहोचल्याने मासेमारी करणाऱ्या स्थनिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT