मुंबई

रिया चक्रवर्तीच्या भावाला जामीन मंजूर; शौविकला तब्बल 90 दिवसांनी दिलासा

सुनिता महामुनकर


मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला आज विशेष एनडीपीएस न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मागील तीन महिन्यांपासून शौविक कारागृहात होता.

शौविकने आतापर्यंत दोन वेळ उच्च आणि विशेष न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. विशेष न्या. जी बी गुरव यांनी पन्नास हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्‍यावर हा जामीन मंजूर केला आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर आरोपींनी दिलेला कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाचा आधार शौविकचे वकिल एड सतीश मानेशिंदे यांनी दाखल केला होता. तसेच त्याच्याजवळ अमलीपदार्थ आढळले नव्हते आणि तो त्याचे सेवनही करीत नाही, या प्रकरणात त्याला नाहक अडकविले आहे, असाही युक्तिवाद त्यांनी केला होता.

 रिया आणि शौविक ड्रग विक्रेत्यांकडून अमलीपदार्थ विकत घेत होते, असा आरोप एनसीबीने ठेवला आहे. मात्र सुशांतसाठी अमलीपदार्थ घेत होतो, असा बचाव दोघांनी केला आहे. ईडीदेखील या प्रकरणात तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT