Shekap Leader K K Mhatre is entering the BJP
Shekap Leader K K Mhatre is entering the BJP 
मुंबई

Loksabha 2019 : शेकापचा मोठा नेता भाजपच्या गळाला; लवकरच करणार भाजप प्रवेश

हर्षल भदाणे पाटील

लोकसभा 2019
पनवेल : कामोठे येथील शेकापचे नेते के. के. म्हात्रे लवकरच अधिकृतपणे हातात कमळ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नामांकित बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जाणारे के. के. म्हात्रे यांनी पनवेलच्या राजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

शेकाप वर का नाराज होते के के म्हात्रे ?
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत ते शेतकरी कामगार पक्षा कडून उभे होते. मात्र त्यांना 1500 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला . महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभव त्यांनी मान्य केला मात्र स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षाने त्यांना विचारातच घेतले नाही, म्हणूनच महापालिका निवडणुकीनंतर म्हात्रे शेकाप पासून दुरावलेले पाहायला मिळाले. म्हात्रे यांच्या सोबत शेकापचे 2 नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याचे समजते आहे.

प्रभागातील भाजप नगरसेवकांशी त्यांचे मतभेद होते. भविष्यात के. के. पक्षात आल्यानंतर गटबाजी नको, या हेतूने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दोन्ही गटांना एकत्र आणल्याचेही समजते. समोरासमोर चर्चा झाल्याने दोन्ही गटाची नाराजी दूर करण्यात रामशेठ ठाकूर यांना यश आले. एकमेकांना पेढे भरवत के. के. म्हात्रे आणि नगरसेवक चिपळेकर यांनी एकमेकांचे तोंड गोड केले. म्हात्रे यांच्या सोबत रवी जोशी, रवी गोवारी, सचिन गायकवाड उपस्थित होते.

के. के. म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. तसेच ते शिवसेनेत जाण्याच्या वावड्याही उठल्या होत्या. मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT