sherlyn and raj kundra  Team esakal
मुंबई

न्यूड व्हिडिओ शूट करणाऱ्या शर्लिन चोप्राने राज कुंद्राबद्दल केला धक्कादायक खुलासा

"शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आणि फोटो आवडतात असे सांगायचा. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी मला अजून प्रेरणा मिळायची"

दीनानाथ परब

मुंबई: पॉर्न रॅकेट प्रकरणात (Porn racket case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) शुक्रवारी तब्बल आठ तास चौकशी केली. मुंबई गुन्हे शाखेच्या संपत्ती विभागाने (Mumbai police crime branch) जबानी नोंदवण्यासाठी शर्लिन चोप्राला बोलावले होते. "राज कुंद्राने आपली दिशाभूल केली. शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडतात असे मला सांगितले. राज कुंद्रा (Raj kundra) माझा मार्गदर्शक होता. त्याने माझी दिशाभूल केली. मी जे काही शूट करतेय ते ग्लॅमर असल्याचे सांगितले. शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आणि फोटो आवडतात असे सुद्धा त्याने सांगितले. सेमी न्यूड आणि पॉर्न सामान्य असल्याचे राजने मला पटवून दिलं होतं. प्रत्येक जण असे करतो, त्यामुळे तू सुद्धा कर" असे राज कुंद्राने सांगितल्याचे शर्लिन चोप्रा म्हणाली.

"कुठून सुरुवात करु ते मला समजत नाहीय. मी अशा स्कँडलमध्ये गोवली जाईन आणि एक दिवस गुन्हे शाखेसमोर मला जबानी द्यावी लागेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी राज कुंद्राला पहिल्यांदा भेटले, त्यावेळी माझे आयुष्य बदलून जाईल असं मला वाटलं होतं. मला मोठा ब्रेक मिळेल, अशी मी कल्पना केली होती. शिल्पा शेट्टीचा नवरा मला चुकीची काम करायला लावेल याची मी कल्पनाही केली नव्हती" असे शर्लिनने सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शर्लिनने ही माहिती दिली आहे.

"आर्म्सप्राईम सोबत मी करार केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ग्लॅमरस व्हिडिओने सुरुवात केली होती. नंतर ते बोल्डपणाकडे झुकले. त्यानंतर मला सेमी न्यूड आणि पूर्णपणे न्यूड व्हिडिओ करावे लागले. प्रत्येक जण असे करतो, त्यामुळे त्यात काही चुकीचे नाही असे मला प्रत्येकवेळी सांगण्यात आले" असे शर्लिन म्हणाली.

या दरम्यान राज कुंद्रा सतत मला "शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आणि फोटो आवडतात असे सांगायचा. त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी मला अजून प्रेरणा मिळायची. शिल्पा शेट्टी सारखे लोक जेव्हा तुमचे कौतुक करतात, तेव्हा काय चूक, काय बरोबर तुम्हाला समजत नाही. असे व्हिडिओ करण्यासाठी जेव्हा माझे कौतुक झाले, त्यावेळी मी आणखी असे व्हिडिओ केले" असे शर्लिनने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT