mumbai sakal
मुंबई

जाहिरात क्षेत्रातील चमकता तारा ; डॉ. योगेश लाखनी

ध्येयसमर्पित जीवनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवल्याशिवाय उत्कर्ष साधता येत नाही

सकाळ वृत्तसेवा

वाशी : ध्येयसमर्पित जीवनाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवल्याशिवाय उत्कर्ष साधता येत नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रतिकूलतेशी संघर्ष करीत भगीरथ प्रयत्नांची जोड देत ‘ब्राईट आऊट डोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश लाखनी यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या योगेश लाखनी यांनी ४० वर्षांपूर्वी ‘ब्राईट आऊट डोअर मीडिया’ची पायाभरणी केली. आजमितीस या जाहिरात क्षेत्रातील ते एक आघाडीचे उद्योजक म्हणून गणले जात आहेत. एका खोलीएवढ्या कार्यालयापासून त्यांनी सुरुवात केली. आज त्यांचे नामांकित आस्थापन आहे. ही त्यांची गरुडझेप प्रेरणादायी आहे. [

लाखनी यांनी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अथक प्रयत्न केले. ‘ब्राईट आऊट डोअर मीडिया’च्या माध्यामातून संपूर्ण शहरात १४०० हून अधिक महाकाय फलक ( होर्डिंग्ज) चालवण्याचा आणि देशभरातील बाह्य जाहिरात सेवा देण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

सध्या कंपनीकडे मनोरंजन, दूरसंचार, किरकोळ, वित्त, दौरा आणि प्रवास इत्यांदी क्षेत्रातील ६०० हून अधिक प्रतिष्ठित ग्राहक आहेत. लाखनी हे जाहिरात उद्योजक क्षेत्रासह सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. दर महिन्याला ३०० हून अधिक गरजू लोकांना मोफत अन्नाची सेवा, याशिवाय धान्यवाटप करण्याचे व्रत त्यांनी आरंभले आहे. तसेच बोरिवलीतील वृद्धाश्रमात २००हून अधिक लोकांना ताजे अन्नवाटप करीत आहेत.

डायलिसिस रुग्णांनाही त्यांनी मदत केली आहे. कोरोना काळात त्यांनी कर्मचाऱ्यांची कपात न करता त्यांना पगार पुरवला. दरवर्षी लाखनी हे त्यांचा वाढदिवस २५ सप्टेंबरला सिनेतारकांच्या उपस्थितीत भव्यतेने साजरा करत असतात. पण कोरोना काळात त्यांनी गरजूंना मदतीचा हात दिला. यंदाही त्यांनी ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. शनिवार, २५ सप्टेंबर रोजी ते वाढदिवस साजरा करणार आहेत. डॉ. लाखनी यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आजवर त्यांनी आठ हजार सिनेमांचे ब्रँडिंग केले आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रातही त्यांनी आता प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

SCROLL FOR NEXT