ulhasnagar.
ulhasnagar. 
मुंबई

उल्हासनगरातील शिवसेना पोहचली बुलढाण्यातील दोन शहिद जवानांच्या घरी

दिनेश गोगी

उल्हासनगर - काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव रद्द करून महोत्सवाच्या नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपयांची रकम देण्यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्ह्यात पोहचली आहे. शिवसेनेने शहीद झालेले संजय राजपूत, नितीन राठोड यांची विधवा पत्नी व मुलाविना पोरके झालेले जन्मदाते यांना समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अंकुश म्हस्के यांच्या हस्ते प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

यावेळी शिवसेना नगरसेवक स्वप्नील बागूल, उल्हासनगर विधानसभा संघटक सागर उटवाल, समितीचे अतुल बोरोले, राजू म्हस्के उपस्थित होते.

गेल्या 17 वर्षांपासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दर वर्षी उल्हासनगरातील शांती नगरातून थाटामाटात दिमागदार मिरवणूक निघते. रथ, घोडे, उंट, पारंपरिक वेशभूषा, दांडपट्टा, 40 फुटाच्या ट्रेलरवर छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक, पोवाडे अशा थाटात आणि गाजावाजात निघणारी ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र पुलवामामध्ये जवान शहीद झाल्याने उत्सव व मिरवणूक रद्द करून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवातील नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपये रकम बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये राहणारे शहीद जवान संजय राजपूत व चोरपांगडा येथील नितीन राठोड यांची पत्नी व जन्मदाते यांना विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज 50-50 हजाराचे चार धनादेश समितीच्या वतीने सुपूर्द करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अंकुश म्हस्के यांनी दिली.

उल्हासनगर पालिकेचेही प्रत्येकी 10 लाखासोबत नगरसेवकांचा पगार ""
दरम्यान पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या संजय राजपूत, नितीन राठोड यांच्या परिवाराला उल्हासनगर पालिकेच्या वतीने प्रत्येकी 10 लाख रुपये व सर्व नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या महासभेत घेण्यात आलेला आहे. हुतात्म्यांच्या परिवाराला 10 रुपये देण्याचा निर्णय घेणारी उल्हासनगर महानगरपालिका महाराष्ट्रात पहिलीच पालिका ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT