Dombivli Railway Station  esakal
मुंबई

Dombivli Railway Station : ..तर रेल्वेला परिणाम भोगावे लागतील; डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पाहणीनंतर शिवसेनेचा इशारा

खासदारांनी पाहणी करताच बदलापूरकरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात सोय रेल्वे प्रशासनाने केली.

शर्मिला वाळुंज

'रेल्वे प्रशासन एकदम ढिम्म गतीने कारवाई करत आहे. आमच्या नंतर बदलापूर स्थानकात शेड येते, पण डोंबिवली स्थानकात येत नाही. यासाठी जाब विचारला.'

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात (Dombivli Railway Station) फलाट क्रमांक 5 आणि 3 वर छत नसल्याने रेल्वे प्रवाशांची उन्हात व पावसाळ्यात गैरसोय होत आहे. खासदारांनी पाहणी करताच बदलापूरकरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात सोय रेल्वे प्रशासनाने केली. मात्र, डोंबिवलीकर या सुविधांपासून वंचित आहे. येथील खासदार या समस्येकडे लक्ष देणार का? याविषयीचे वृत्त दैनिक सकाळने 24 जूनला प्रसारीत केले. याची दखल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी घेत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना डोंबिवली स्थानकाची पाहणी करण्यास सांगितले.

आज युवा सेनेने डोंबिवली स्थानकाची पाहणी केली. बदलापूर येथे शेड उभारले, मात्र डोंबिवलीत नाही. हे काम लवकर केले नाही तर त्याचे रुपांतर आंदोलनात होऊन त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागतील, असा इशारा युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही. त्यामुळे गेले अनेक महिने उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. तसेच फलाट क्रमांक तीनवर काम सुरु असल्याने महिलांच्या डब्याच्या ठिकाणी असलेले छत प्रशासनाने काढून टाकले आहे. पाच सहा महिन्यांपासून हे काम देखील असून या ठिकाणी उन्हाचा, पावसाचा त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याविषयी रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना यांच्याकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, याची दखल रेल्वे अधिकारी घेत नाहीत.

बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केल्यानंतर या ठिकाणी पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरुपाचे छत रेल्वे प्रशासनाने बांधले. खासदारांनी पाहणी करताच रेल्वे प्रशासन जागे होत असेल तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या स्थानकाची पाहणी करणार का? जेणेकरून रेल्वेला जाग येऊन येथे देखील तात्पुरत्या स्वरूपाच्या शेडची उभारणी करुन प्रवाशांना दिलासा मिळेल. याविषयी सविस्तर वृत्त दै. सकाळने सोमवार 24 जून ला प्रसारित केले होते. याची दखल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अखेर घेतली आहे.

स्वतः पाहणीसाठी ते आले नसले तरी मंगळवारी शिवसेनेचे राज्याचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांना त्यांनी स्थानकाची पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार दिपेश यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट 3 आणि 5 ची पाहणी केली. रेल्वे प्रवाशांच्या समस्या देखील त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. यावेळी डोंबिवली स्टेशन प्रबंधक संतोष अग्रवाल हे देखील उपस्थित होते.

याविषयी सचिव दिपेश म्हणाले, डोंबिवलीकरांच्या बऱ्याचशा तक्रारी खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे आल्या होत्या. फलाट 3 वर महिलांचा जिथे डब्बा आहे, तिथे एफओबीचे काम सुरु आहे. त्यामुळे महिलांना येण्या जाण्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. त्याची पाहणी आम्ही केली आहे. स्टेशन प्रबंधकांशी चर्चा करुन प्रवाशांना येण्या जाण्यासाठी जागा कशी उपलब्ध होईल याची आम्ही चर्चा केली आहे. तसेच स्टेशन मधील ज्या काही समस्या आहेत, प्रवाशांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्याची पाहणी करुन काही सूचना रेल्वे प्रबंधकांना दिल्या आहेत. फलाट 5 वर गेल्या वर्षभरापासून शेडची कमतरता आहे.

त्यासाठी रेल्वे प्रशासन एकदम ढिम्म गतीने कारवाई करत आहे. आमच्या नंतर बदलापूर स्थानकात शेड येते, पण डोंबिवली स्थानकात येत नाही. यासाठी जाब विचारला असून लवकरात लवकर ही शेड उभारुन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आपल्याला माहित आहे की डोंबिवलीकर नागरिक खूप सहनशील आहेत. परंतू त्यांच्या संयमाचा बांध फुटण्याची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासन जाणीव पूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत असेल जर लवकर हे काम झाले नाही तर याचे रुपांतर आंदोलनात होऊन त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

लवकरच खासदार शिंदे हे रेल्वे अधिकाऱ्यांसह या स्थानकाची पाहणी करण्यास येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. स्टेशन प्रबंधक संतोष अग्रवाल यांना यावेळी शिवसेना युवा सेनेकडून निवेदन देण्यात आले. याविषयी वरिष्ठांना कळविले जाईल. या स्थानकातील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन प्रबंधकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT