milind narvekar 
मुंबई

स्वत:च्याच बंगल्यावर नार्वेकरांचा हातोडा

मुरुडमध्ये अनाधिकृत बांधकामाची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ, (जि.रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील मुरुड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला बंगला स्वत:च पाडण्यास सुरवात केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे बांधकाम अनधिकृत असून किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड)मध्ये येत असल्याची तक्रार केली होती.

मात्र महसूल प्रशासनाने कोणतीही नोटिस दिलेली नसताना नार्वेकर यांनी बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य आणि तर्कविर्तक केले जात आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. २३) मुरुडला उद्‌ध्वस्त केलेल्या बंगल्याची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड येथे जागा विकत घेऊन या जागेत असलेले पूर्वीचे घर पाडून तेथे नवीन बंगला बांधण्याचे काम सुरू केले होते.

मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे बांधकाम अनधिकृत असून ते सीआरझेडमध्ये येत असल्याची तक्रार केली होती. या बंगल्याची पाहणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे अधिकाऱ्यांनीही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT