Shiv Sena likely to be in trouble Ramdas Kadam and Anandrao Adsul suspended shinde group appoint them  sakal
मुंबई

शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कदम, अडसूळ यांची हाकालपट्टी भोवणार?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर हा पक्ष आधीच अडचणीत आला आहे. त्यातच पक्षाने राष्ट्रीय कार्यकारिणीतील पक्षनेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी केल्यानंतर व शिंदे गटाने नेते म्हणून त्यांची नियुक्ती केल्यानंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हावर प्रशचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबई विभाग यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार आहेत. तर, उर्वरित पाच जागा निवडून देण्याचे अधिकार पक्षप्रमुख यांना दिले गेले आहेत. या निवडीचा कालावधी हा ५ वर्षांचा आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. तर, पक्षप्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले आहे.राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ नेत्यांपैकी सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना असलेल्या अधिकारात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी केली आहे. आनंदराव अडसूळ व रामदास कदम यांचीही पक्षप्रमुखांनी दोन दिवसांपूर्वी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीत आता उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही मूळ शिवसेना पक्ष म्हणजे आमचा गट असल्याचा दावा करीत आहेत. शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे गट पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे.

प्रतिनिधी सदस्यांसाठी शिंदे गटाचे प्रयत्न

शिवसेनेच्या २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान २५० प्रतिनिधी सदस्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शिंदे गट निकराने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शिवसेनेतील राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांनाच आपल्याकडे वळवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.

- पांडुरंग म्हस्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT