Aditya Thackeray esakal
मुंबई

Aditya Thackeray: सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा पण...; आमदार अपात्रतेचा निकाल विरोधात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदार आपात्रतेप्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मूळ राजकीय पक्षा संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे. तसेच आता सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena MLA Disqualification Result Aditya Thackeray says expectation from SC)

ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर किंवा खोक्यांचा राजकारण झालं तर अशाच प्रकारे त्यांना वाचवले जाईल. भाजपाला आपलं संविधान बदलायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायचं आहे ते स्पष्ट झालं. (Marathi Tajya Batmya)

अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते?लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीत खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेलं आहे, असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. जगाला आता कळलेलं आहे की, आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे आणि देशात हिटलरशाही सुरू झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT