Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena sakal
मुंबई

Shiv Sena MLA Disqualification: आमदार अपात्रतेचा विषय उद्धव ठाकरेंनी दिला सोडून? सुप्रीम कोर्टाला लगावला खोचक टोला

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिकांवर ३ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिकांवर ३ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण सप्टेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं या प्रकरणावर सुनावणी घेण्यास बराच उशीर झाल्यानं आता उद्धव ठाकरेंनी हा विषय सोडूनच दिल्याची चर्चा आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत उद्गिग्नपणे यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या दोन्ही पक्षांबाबत निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या दोन्ही पक्षांची मूळ निवडणूक चिन्ह आणि मूळ पक्ष हे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बहार केले होते. पण या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.

या याचिकांवर ३ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. एकापाठोपाठ या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होईल अशी माहिती सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी दिली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात यासंबंधी पार पडलेल्या सुनावणीत अजित पवारांसह पक्षाच्या ४१ आमदारांना कोर्टानं नोटीस बजावली आहे.

दरम्यान, आज (मंगळवार) उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आमदार अपात्रेच्या निकालाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरेंनी केवळ एकाच वाक्यात पण उद्विग्नपणे सुप्रीम कोर्टाला उद्देशून खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. ठाकरे म्हणाले, "आमदार अपात्रतेचा येत्या पाच-दहा वर्षात निकाल लागेल असं मला कळलेलं आहे, बघुयात काय होतंय. आशा करतो अशी की पाच-दहा वर्षात तरी निकाल लागेल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT