मुंबई

ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु

पूजा विचारे

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांना तीन वेळा समन्स बजावला होता.  टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झालेत. तसंच विहंग सरनाईक यांचीही चौकशी सुरु आहे. 
  
सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 

बुधवारी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले. टॉप्स सिक्युरिटी संबंधित कथित गैरव्यवहारामध्ये सरनाईक, त्यांचा मुलगा विहंग आणि योगेश चंदेला यांनी न्यायालयात याचिका केली. या चौकशीच्या एक दिवस आधीच त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आजच्या चौकशीचे व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करावे, चौकशी करताना त्यांचे वकिलही हजर असतील या मागण्या केल्या आहेत. 

ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. दरम्यान छाप्यांनंतर ईडीने सरनाईक आणि टॉप्स ग्रुपचे प्रमुख राहुल नंदा यांच्याशी संबंधीत अमित चांदोले या व्यक्तीला अटक केली होती.

Shiv Sena MLA Pratap Sarnaik arrives office of Enforcement Directorate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT