उल्हासनगर: महिला-मुलींच्या सुरक्षितेबाबत सरकार उदासीन असल्याच्या निषेधार्थ शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने उद्या रविवारी 6 तारखेला उल्हासनगर ते कल्याण पूर्व पर्यंत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी ही माहिती दिली.
रोजच्या बातम्यांमध्ये विनयभंग,अत्याचार असे प्रकार आपल्या अवती भवती होताना दिसत आहेत.तिसगाव येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाली होती.मात्र अद्यापही त्या आरोपीला शिक्षा झालेली नाही. शिळफाटा येथे झालेली महिलेची आणि उरण येथे झालेली तरुण मुलीची हत्या.तसेच बदलापुर येथील अत्याचाराचे उदाहरण ताजे असतानाच,या घटनेनंतरही कॉलेज आणि शाळेतील अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडतच आहेत.
तसेच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यामध्ये चक्क महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झालेला ब्लेडहल्ला करण्यात आला असून जिथे पोलिसच सुरक्षित नाही तिथे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित कसा राहणार?असा सवाल धनंजय बोडारे यांनी उपस्थित केला आहे.हि सर्व परिस्थिती बदलायची असेल तर देवी महिषासुरमर्दिनी जागृत होऊन या दुष्टशक्तीचा नाश होऊ दे असे साकडे घालण्यासाठी नवरात्रीच्या पवित्र दिवसात मशाल पेटवावी लागेल.
त्यासाठी सर्व पदाधिकारी,महिला आघाडी,युवासेना,युवती सेना,शिवसैनिकांनी रविवारी 6 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून उल्हासनगरातील जिजामाता उद्यान ते प्रभागक्षेत्र(ड)डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन कल्याण पूर्व पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या मशाल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे धनंजय बोडारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.