Milind Narvekar 
मुंबई

उद्धवनिष्ठ नार्वेकर विधिमंडळात अवतरले!

शिवसेना नेतृत्व आणि बंडखोर आमदारांत पुन्हा एकोपा ठेवण्यासाठी नार्वेकर यांनी प्रयत्न केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे आहे,’'' अशा शब्दात शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावर निष्ठा दाखविलेले आणि ऐन बंडाळीत ठाकरेंभोवती न दिसलेले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविवारी मैदानात उतरले. सभागृहाच्या कामकाजापूर्वी तासभर आधीच विधान भवन गाठून त्यांनी स्वपक्षातील उरल्यासुरल्या आमदारांसोबत चर्चा केली. ‘व्हीप’च्या मुद्दयावरून बंडखोरांशी दोन हात करण्याच्या मोहिमेसाठी नार्वेकर सरसावल्याचे दिसले.

विधान परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना भेटल्यानंतर नार्वेकर हे थेट सभागृहाच्या गॅलरीत बसून कामकाजावर नजर ठेवली. शिवसेना नेतृत्व आणि बंडखोर आमदारांत पुन्हा एकोपा ठेवण्यासाठी नार्वेकर यांनी प्रयत्न केले. त्यानंतर मात्र, गेली पाच दिवस नार्वेकर हे ‘मातोश्री’ आणि ठाकरे यांच्यापासून लांब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात होता. त्यात शिंदे आणि नार्वेकर यांच्या मैत्रीचाही दाखला दिला गेला.

शिवसेना आणि ठाकरे सरकारची पडझड होत असतानाच नार्वेकर हे गायब असल्याच्या बातम्या रंगत होत्या. त्यावर नार्वेकर यांनीही आपली भूमिका मांडली नव्हती. परंतु, विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी नार्वेकर हे आज सकाळी १० वाजताच विधान भवनात पोचले. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या आमदारांआधीच ते आल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी राजन साळवी, पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची भेट घेतली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच नार्वेकर हे गॅलरीत गेले.

बंडखोर गटाच्या भूमिकेमुळे शिवसेनेपुढे कायदेशीर आणि तांत्रिक पेच उभा राहणार असल्याने नार्वेकर हे आर्वजून अधिवेशनासाठी हजर राहिले. उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांना पाठविल्याचे सांगण्यात आले.

आदित्य -नार्वेकर भेट

आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट विधान भवन आवारात झाली तेव्हा, ‘मिलिंद तुम्ही मीडियाशी बोललात?’ अशी विचारणा आदित्य यांनी त्यांना केली. सध्याच्या राजकीय गोंधळात नार्वेकर गायब असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे ही विचारणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT