dombivli
dombivli sakal
मुंबई

Loksabha Election 2024: तुझं एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी ; शिवसेना ठाकरे गटाची डोंबिवलीत बॅनरबाजी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : मतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये...तुझं एक मत 'हुकूमशाही' उलथविण्यासाठी'' अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौका चौकात सकाळ पासून झळकत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबिवली शहर शाखेच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत असून ठाकरे गट लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसून कामाला लागल्याची चर्चा सुरु आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहे. विकास कामांचा धडाका, त्यासाठी निधीची तरतूद, कामांचे लोकार्पण, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार राजकीय पक्षांकडून सुरु आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिंदे गट व अजित पवार गटाकडून देखील आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपड सुरु आहे.

त्यातच विधानसभेची देखील गणिते पक्षांकडून आखली जात आहेत. यासोबतच नुकताच विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हि एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राज्याच्या राजकारणात काहीसा सक्रिय झालेला दिसला. त्यातही आत्तापर्यंत शांततेच्या भूमिकेत असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मतदार संघाच्या दौऱ्यावर उतरल्याचे दिसून आले आहे.

संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पहिलाच दौरा राज्यात केला. तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात. याठिकाणी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटाची ताकद दाखवून देण्यात आली आहे. या संपर्क दौऱ्यादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टिका केली होती. तसेच आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन देखील जनतेला केले होते.

यानंतर आता शहरात उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. डोंबिवली स्टेशन परिसर, चौक आदि ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये हुकूमशाही या शब्दाला हायलाईट करत हुकूमशाही उलथविण्यासाठी तुमच एक मत महत्वाचे आहे. असा संदेश देण्यात आला आहे.

तसेच देशात लोकशाही आहे, परंतू सत्ताधाऱ्यांची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे हा संदेश देण्यासाठी तुझं हे मतदान शेवटचं ठरु नये असे सुचक वक्तव्य त्या संदेशात करण्यात आले असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला केवळ मतदारांना जागृक करायचे आहे त्यासाठी हे बॅनर लावल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT