‘Rahul Shewale
‘Rahul Shewale  esakal
मुंबई

Rahul Shewale : ‘व्हीप’ डावलणाऱ्या खासदारांवर कारवाई; राहुल शेवाळे यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महिला आरक्षणसंदर्भात लोकसभेमध्ये मांडण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा ‘व्हीप’ डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा शिवसेनेने (शिंदे गट) घेतला आहे. या खासदारांवर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेचे (शिंदे गट) लोकसभेतील नेते राहुल शेवाळे यांनी बुधवारी दिला.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन देणारे विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांची कोंडी करण्याचा महायुतीचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांनी नाइलाजाने या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी याचे खंडन करून काँग्रेसनेच महिला विधेयकासंबंधी सर्वप्रथम पावले उचलली असल्याचे सांगितले.

या विधेयकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होत असताना शिवसेनेने (शिंदे गट) मात्र याचा वापर उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी करण्याचे ठरविले आहे. ‘काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे,’ असे शेवाळे म्हणाले.

‘‘शरद पवार यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदानावेळी अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोदपदी खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला ‘व्हीप’ शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना ‘व्हीप’ जारी केला होता.

मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या ‘व्हीप’चे उल्लंघन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे,’’ असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केले.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव हे तर दिल्लीमध्ये असूनही सभागृहात आले नाहीत. या सर्वच खासदाराच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. कारण शिवसेना पक्ष म्हणून अद्यापही सर्व खासदार हे आमच्या सोबतच आहेत.

- राहुल शेवाळे, लोकसभेतील नेते, शिवसेना (शिंदे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT