Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackeray esakal
मुंबई

Shivsena : दसरा मेळाव्यासाठी सेनेकडून प्लान B ची तयारी; MMRDA ला लिहिलं पत्र

आगामी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shivaji Park Dasara Melava Row : आगामी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत यावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर नेमका एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मेळावा घेणार याचा पेच कायम आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून मेळाव्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जर, मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी दिली नाही. तर, प्लॅन बी तयार असावा यासाठी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी MMRDA ला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केल्याचं समजत आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेतर्फे दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिण्यात आले असून, बीकेसीमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी यात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवरील मेळाव्यावर ठाम

दुसरीकडे, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम असून, काल पार पडलेल्या बैठकीतही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे. त्यात आता शिवसेनेने बीकेसी मौदानावर मेळाव्याच्या परवानगी मिळावी यासाठी पत्र पाठवल्यामुळे शिवसेकडून मेळाव्याच्या नियोजनासाठी प्लॅन बी वर काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही गटांकडून पाठवण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून त्या संदर्भातील अहवाल मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवला जाणार आहे. त्यानंतरच नेमकी शिंदे गटाला की ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी परवानगी देण्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT