Shivaji Park Mumbai uddhav thackeray and sharad pawar esakal
मुंबई

India Alliance Sabha: संविधान बदलण्यासाठी भाजपला 400+ हवेत, छोडो 'भाजप'ची घोषणा! पवार-ठाकरेंनी शिवाजी पार्क गाजवलं

India Alliance Sabha: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले.

Sandip Kapde

India Alliance Sabha:

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते शिवाजी पार्कवर आले होते. यावेळी आयोजित सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.

देशातील परिस्थितीत बदल आणण्याची गरज आहे. दबावतंत्राविरोधात आपल्याला पाऊले उचलावी लागतील. आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी गॅरंटी दिली. महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांविरोधात छोडो भारत घोषणा दिली होती. आता त्याच शहरातून  छोडो भाजप असा नारा आपल्याला द्यावा लागले, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील सभेला संबोधित केले. दिल्लीतील हुकूमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडण्यात आलं. भाजप फुगा आहे आम्ही त्यात हवा भरली होती. संपूर्ण भारतात यांचे दोन खासदार होते. आम्ही त्यात हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली.

भाजप ४०० पार म्हणतात हे काय फर्निचरचे दुकान आहे का?, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींच्या कुटुंबात ते आणि त्यांची खुर्चीच आहे. तोच मोदींचा परिवार आहे. घटना बदलण्यासाठी भाजपला ४०० पार हवे आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला.

आपली ओळख देश असली पाहीजे. व्यक्ती म्हणजे देश व्हायला नको. देश हाच माझा धर्म आहे. आपली लढाई लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. जेव्हा जनता एकत्र येते तेव्हा हुकूमशाह नष्ट होतो. अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT