ekanth shidne aditya thackeray c sakal
मुंबई

Shivsena: आदित्य ठाकरेंनी पोरकट वर्तन थांबवावे; शिवसेना प्रवक्त्यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारवर केलेले आरोप बालिश असून आदित्य यांनी आता मोठे व्हावे आणि बालिश वर्तन थांबवावे, तसेच आरोप करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी, असा टोला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. सरकारने लोकांसाठी आतापर्यंत काय केले, असा त्यांचा आरोप होता. ठाकरे यांचे हे आरोप धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत, असे प्रत्युत्तर श्रीमती शहा यांनी दिले आहे. त्यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर व्हिडियो टाकून हे प्रत्युत्तर दिले आहे.

राज्य शासनाने एक कोटी नागरिकांना शासन आपल्या दारी योजनेचा फायदा दिला. औद्योगिकदृष्ट्या राज्याची देशातील आघाडी टिकवून ठेवली आणि देशाची आर्थिक राजधानी हा दर्जाही कायम ठेवला. या सरकारच्या काळात राज्यात साडेतीन लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली.

दहीहंडी ला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाल्याने आता गोविंदांना नोकऱ्याही मिळतील. त्याखेरीज महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमार्फत सर्व रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचारही निशुल्क देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आदित्य यांनी पूर्ण माहिती घ्यावी, असेही श्रीमती शहा यांनी त्यांना सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

IND vs SL 2nd Test: ठणठणीत खेळपट्टी गोलंदाजांना सतावणार; भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून

Third Mumbai: 'तिसरी मुंबई' साठी भूसंपादनाला वेग! ५५० एकर जमीन अन् चार हजार कोटी रुपयांचा खर्च

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT