(Arvind Sawant, Vinayak Raut, Anil Desai sakal
मुंबई

Shivsena: अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह २८ शिवसैनिक निर्दोष; वाचा नेमक काय आहे प्रकरण

२४ जुलै २००५ रोजी प्रभादेवी येथील शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयाजवळ राणे समर्थकांनी सभा आयोजित केली होती| On July 24, 2005, Rane supporters organized a meeting near the office of Shiv Sena mouthpiece 'Samana' in Prabhadevi.

सकाळ वृत्तसेवा

Shivsena Vs Narayan Rane: नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००५ साली शिवसैनिकांनी त्यांची सभा उधळवून लावल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला. खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई आदींसह सर्व २८ शिवसैनिकांची न्या.राहुल रोकडे यांनी निर्दोष सुटका केली.(Arvind Sawant, Vinayak Raut, Anil Desai)

२४ जुलै २००५ रोजी प्रभादेवी येथील शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयाजवळ राणे समर्थकांनी सभा आयोजित केली होती या सभेत शिवसैनिक घुसले व राणे समर्थकांना भिडले यावेळी झालेल्या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला गुडघ्याला इजा झाली.

याप्रकरणी पोलिसांनी ४७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींमध्ये खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार रवींद्र वायकर, किरण पावसकर, दगडू सकपाळ, विशाखा राऊत व इतर शिवसैनिकांचा समावेश आहे. याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समोर हा खटला चालला.(MP Vinayak Raut, Arvind Sawant, Anil Desai, MLA Ravindra Waikar, Kiran Pavaskar, Dagdu Sakpal, Visakha Raut)

साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असण्याबरोबरच आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावेच नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शिवसैनिकांना दिलासा दिला व त्यांची निर्दोष मुक्तता केली.Shivsena

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT